अयोध्येतील राम मंदिर उभारणीला दोन मुहूर्त; 'या' दिवशी होऊ शकते सुरुवात

सकाळ वृत्तसंस्था
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

ट्रस्टवरील एका सदस्याने सांगितले की 2 एप्रिल हा दिवस मंदिर उभारणी करण्यास महत्वाचा आहे. कारण या दिवशी रामनवमी आहे.

नवी दिल्ली : राम मंदिर बनविण्यासाठी ट्रस्ट स्थापन केल्यानंतर आता आता राम मंदिर बांधणीला वेग येणार आहे. ट्रस्टची पहिली बैठक 19 फेब्रुवारीला होणार आहे. ही बैठक ट्रस्टच्या दिल्ली आॅफिस आणि के परासरण यांच्या निवासस्थानी होईल. ही बैठक सांयकाळी 5 वाजता होईल. या बैठकीत ट्रस्टचे अध्यक्ष, महामंत्री, कोषाध्यक्ष यांची निवड होण्याची शक्यता आहे. यातील दोन सदस्यांची निवड निवडणूक होऊन होणार आहे. 

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मुहूर्त रामनवमी व अक्षय्यतृतीया या दोन्हीपैकी एक दिवस निवडावा अशी अपेक्षा अनेक स्वामी व मठाधिपती यांनी व्यक्त केली. याबाबत अद्याप निर्णय झाला नसून, हा निर्णय देखील याच बैठकीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

हे पण वाचा - का होते मुलींची छेडछाड : वाचा सकाळचा स्पेशल रिपोर्ट ताज

ट्रस्टवरील एका सदस्याने सांगितले की 2 एप्रिल हा दिवस मंदिर उभारणी करण्यास महत्वाचा आहे. कारण या दिवशी रामनवमी आहे. प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता. कामास सुरवात करण्यास हा दिवस शुभ आहे. या दिवशाच उभारणीस सुरवात करावी.

ट्रस्टवर नियुक्ती झालेले स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले. की, मंदिर उभारण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही. काही लोक न्यायालयाच्या निर्णयानंतरही भडकावू भाषणे करत होते. परंतू त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. भारताचे नागरिक राम नामाचा जप करत होते.

हे पण वाचा - आता कोरोना व्हायरसला घाबरायची गरज नाही; हे वाचा! 

दरम्यान, आता भव्य राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये माझा खारीचा छोटासा वाटा उचलण्याचा प्रयत्न असणार आहे. यात कोणताही जय पराजय असा भाग नाही, तर अनेक पिढ्यांचे स्वप्न असलेले राम मंदिर पूर्ण होणार आहे. याचबरोबर, राष्ट्र उभारणी आणि अजय देश उभारण्याचा संकल्प आहे, असे स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first meeting of ram janmabhoomi trust will be held on 19 februari