
नवी दिल्ली- भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात लस निर्मितीचे कामही वेगाने सुरु झाले आहे. भारत बायोटेकने भारतातील पहिली कोरोनावरील लस बनवली असून तिचे पहिल्या टप्प्यातील मानवी परिक्षण सुरु झाले आहे. 15 जूलैपासून 375 स्वयंसेवकांवर कोरोनावरील लसीची चाचणी सुरु झाली आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
भारतात कोरोनाचा उद्रेक कायम; गेल्या 24 तासांत 671 जणांचा मृत्यू
पहिल्या टप्प्यातील चाचणीत लस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या शरीरावर काही दुष्परिणाम पडतोय का हे पाहिलं जाणार आहे. मात्र, कोवॅक्सिन लस कोरोना विषाणूवर प्रभावी ठरत आहे किंवा नाही हे चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कळून येईल. जगभरातील 12 रुग्णालयात लसीची पहिली चाचणी सुरु करण्यात आली आहे. यात एआयआयएमएस दिल्ली, एआयआयएमएस पाटणा अशा संस्थांचा समावेश आहे.
हैदराबादमधील भारत बायोटेकने इंडियन कॉऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या(ICMR)मदतीने कोरोनावरील लस कोवॅक्सिनची (COVAXIN) निर्मिती केली आहे. कोवॅक्सिन कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. भारत सरकारडून फेज-1 आणि फेज-2 च्या मानवी चाचणीसाठी परनवानगी मिळणारी भारत बायोटेक पहिली कंपनी ठरली आहे. भारतातील एकून सात कंपन्या लस निर्मितीच्या कामात गुंतल्या आहेत.
कोरोनाच्या संसर्गाचा उच्चांक; देशातील बाधितांची संख्या दहा लाखांवर
लसीचा पहिला डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांवर त्याच्या होणाऱ्या परिणामांचे परिक्षण केले जाणार आहे, त्यानंतर 14 दिवसाच्या अंतराने त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. या काळात स्वयंसेवकांवर लसीचा काही दुष्परिणाम होत आहे का हे तपासले जाईल. एआयआयएमएसचे अधीक्षक डॉक्टर सीएम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लस 22 ते 50 वय वर्ष असणाऱ्या निरोगी महिला आणि पुरुषांना देण्यात येणार आहे.
तयार करण्यात आलेली लस SARS-CoV-2 वर प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. चाचणी यशस्वी ठरली तर कोवॅक्सिनचे 20 कोटी डोस तयार करण्याची आमची तयारी आहे, असं भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. क्रिष्णा इला यांनी म्हटलं आहे. कोवॅक्सिन लस हैदराबादच्या जिनोम व्हॅली येथील उच्च कंटेनमेंट सुविधेमध्ये तयार केली जात आहे. प्राण्यांवर या लसीची चाचणी घेण्यात आली असून त्यातून सुरक्षित परिणाम दिसून आले आहेत. आता मानवी चाचणी यशस्वी ठरल्यास लोकांसाठी ही लस वरदान ठरणार आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या पुढे गेला आहे. तर आतापर्यंत 26 हजारांपेक्षाही अधिक लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. अशात कोरोना लस केव्हा निर्माण होते आणि ती सर्वांसाठी केव्हा उपलब्ध होते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. कोरोना लस निर्मितीचे काम वेगाने सुरु असून आता मानवी चाचणीलाही सुरुवात झाली आहे. मात्र, ही सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला सहा महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.