अवकाशात जाणाऱ्या भारतीय रोबो अंतराळविराचा फोटो व्हायरल        

first robot who will going to Gaganyaan
first robot who will going to Gaganyaan

पुणे : भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहीम 'गगनयान'कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अवकाश मोहिमेतील चाचण्या घेण्यासाठी पहिल्या मानवी रोबोची (ह्युमनॉइड) निर्मिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. भारताचा अवकाशात जाणारा पहिला ह्युमनोईड 'व्योममित्रा'ची पहिली झलक समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे.

गगनयान या मानवी अवकाश मोहिमेतून माणसाच्या आधी दोन वेळा व्योममित्रा या ह्युमनॉइडला अवकाशात पाठवून यानाची चाचणी घेण्यात येणार आहे. ह्युमनॉइडवर बसवण्यात आलेल्या सेन्सरच्या साह्याने गगनयानात बसून जाणाऱ्या अवकाशवीराच्या शरीरावर नेमके काय परिणाम होतील हे आधीच समजू शकणार आहे.

भारत हा स्वतःचा अवकाश कार्यक्रम असणारा असा पहिला देश ठरणार आहे, जो आपल्या नागरीकाला अवकाशात पाठवण्याआधी कोणत्याही इतर प्राण्यावर चाचणी घेणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com