..तर गोव्यात मत्स्यदुष्काळ शक्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पणजी : गोव्यात एलईडी पद्धतीची मासेमारी बंद न केल्यास मत्स्यदुष्काळ दूर नाही, अशी भीती उपसभापती मायकल लोबो यांनी गोवा विधानसभेत व्यक्त केली. एलईडी मासेमारी करणाऱ्यांचा परवाना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली.

पणजी : गोव्यात एलईडी पद्धतीची मासेमारी बंद न केल्यास मत्स्यदुष्काळ दूर नाही, अशी भीती उपसभापती मायकल लोबो यांनी गोवा विधानसभेत व्यक्त केली. एलईडी मासेमारी करणाऱ्यांचा परवाना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले, म्हापसा पालिकेचे नवे मासळी मार्केट उत्कृष्ट होते. आज देखभालीअभावी त्या मार्केटची रयाच गेली आहे.  म्हापशात पार्किंगच्या व्यवस्थेची गरज आहे. पालिका कामगार दैनंदिन तत्वावर वा कंत्राट पद्धतीवर काम करतात. पालिका क्षेत्र ते स्वच्छ ठेवतात. त्यांना सरकारने सेवेत घ्यावे. स्वच्छ भारत ही आमची घोषणा आहे. गोमंतकीयांना ताजे व परवडण्याजोग्या दरात मासे देण्यासाठी योजना आखावी. मासे विक्री करणाऱ्या वाहनांची संख्या वाढवावी. मासे बाजारात येईपर्यंत दर तिपटीने वाढतो त्यावर सरकार कसे नियंत्रण ठेवणार. मासे महाग झाले आहेत.
मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे म्हणाले, चार गावांतील मच्छीमार चोपडे येथे शापोरा नदी आहे. तेथे होडीतून मासेमारी करणाऱ्यांसाठी धक्का नाही. मोरजी, मांद्रे, हरमल, केरी येथे जाळी दुरूस्त करण्यासाठी शेड बांधावी. केरी येथील मच्छीमारी शेड कधीही कोसळू शकते. ती दुरुस्त करावी. एका कुटुंबाला एकच मच्छीमारी होडी हा नियम शिथील करावा. खाजनगुंडो, आगरपोय येथील मानशींची स्थिती दयनीय झाली आहे. खाजनगुंडो बांधाचे काम करताना मानस ठेवली गेली नाही ती पूर्ववत करावी. बंधाऱ्यांअभावी शेती पडिक राहत आहे. नाल्यांतील गाळ उपसण्याची गरज आहे. 

हळदोण्याचे आमदार ग्लेन टिकलो म्हणाले, पालिका कर्मचाऱ्यांचे समान केडर केले पाहिजे.त्यांच्या मनात बदलीची भीती असली पाहिजे. सध्या एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली होते. कचरा समस्येचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. न्यायाधीशांची पदे वाढवावी म्हणजे खटले वेगाने निकाली निघतील. गोव्याबाहेर जाणाऱ्या माशांवर नियंत्रण आणले पाहिजे. गोमंतकीय नको झाल्यासच मासे बाहेर नेण्यास द्यावेत. मालिम धक्क्यावर बाहेरचे मासेमारी विक्रेते आहेत. याची दखल सरकारने घ्यावीत. मच्छीमारांना सवलती सरकार देते त्याअर्थी गोमंतकीयांना प्राधान्याने मासे मिळाले पाहिजेत.

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर म्हणाले, केप्यात मासे व भाजीपाला मार्केटची इमारत बांधावी. सध्याचे मार्केट मोडून त्यासाठी जागा उपलब्ध केली आहे. विक्रेत्यांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे. त्यांना हे मार्केट लवकर उपलब्ध करण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fish drought possible in goa