न्या. उपाध्याय यांनी २५ पानी अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर केला असून नोटांच्या पोत्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ देखील देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीतील सरकारी निवासस्थानी कोट्यवधी रुपये सापडल्यानंतर चर्चेत आलेले उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायाधीश यशवंत वर्मा (Judge Yashwant Verma) यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तीन न्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना केली आहे. जळालेल्या नोटांची पाच पोती सापडल्याचा उल्लेख सरन्यायाधीशांना सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आला आहे.