Five Killed as Car Crashes Into Truck Bodies Cut Out With Cutter in Horrific Midnight Accident
Five Killed as Car Crashes Into Truck Bodies Cut Out With Cutter in Horrific Midnight AccidentEsakal

भरधाव कार ओव्हरटेक करताना मागून ट्रकला धडकली, ५ जणांचा मृत्यू; कटरने कापून मृतदेह काढले बाहेर

Car Accident : कारने मध्यरात्री ट्रकला मागून धडक दिल्यानंतर घटनास्थळी इतकी भीषण परिस्थिती होती की गाडीत अडकलेले मृतदेह कटरने पत्रा कापून बाहेर काढावे लागले. गाडीचा चक्काचूर झाला होता.
Published on

भरधाव ग्रँड विटारा कारने ट्रकला मागून धडक दिल्यानं पाच व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला होता. तर गाडीत अडकलेले मृतदेह कटरने पत्रा कापून बाहेर काढावे लागले. बिहारच्या पटना-गया-डोभी चौपदरी महामार्गावर ही दुर्घटना घडली. बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास परसा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुईया वळणावर हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com