

नदीत बुडणाऱ्या मुलीला वाचवण्यासाठी पाच जणांनी उड्या मारल्या. पण पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. तर मुलगी सुखरुप वाचली आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नुल जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. तुंगभद्रा नदीत ती पाय घसरून पडली होती. नदीत मुलगी बुडत असल्याचं समजताच नदीकिनारी असलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. त्यावेळी मुलीचा जीव वाचवण्यासाठी नदी काठच्या काही लोकांनी उड्या मारल्या. तिला वाचवायला ५ जण नदीत गेले पण ते पाचही जण बुडाले. Five People Missing in Tungabhadra River While Saving Teenage Girl