

Deadly Road Accident in Odisha Claims Lives of Five Police Officers
Esakal
ओडिशात भरधाव ट्रकने पोलिसांच्या बोलेरो गाडीला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात पाच पोलिसांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की पोलिसांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झारसुगुडा पोलीस ठाण्याजवळच पहाटे हा अपघात झाला.