
कोरोनामुळे येथील संपूर्ण कुटुंब पंधरा दिवसांमध्ये उद्धवस्त झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनामुळे एकाच घरातील 6 जणांचा मृत्यू झाला, तर सातव्याची प्रकृती गंभीर आहे. आईच्या पार्थिवाला खांदा दिलेल्या पाचही मुलांचा मृत्यू झाला आहे.
धनबाद (झारखंड): कोरोनामुळे येथील संपूर्ण कुटुंब पंधरा दिवसांमध्ये उद्धवस्त झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनामुळे एकाच घरातील 6 जणांचा मृत्यू झाला, तर सातव्याची प्रकृती गंभीर आहे. आईच्या पार्थिवाला खांदा दिलेल्या पाचही मुलांचा मृत्यू झाला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका कुटुंबामध्ये कोरोना प्रवेश केला होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील सहा जणांचा गेल्या 15 दिवसात मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना धनबादच्या कात्रस भागात घडली आहे. येथील रांची बाजारात राहणाऱ्या एका 88 वर्षीय महिलेचा 4 जुलै रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आईच्या पार्थिवाला मुलांनी खांदा दिला होता. यानंतर त्यांनाही कोरोना झाला होता. त्यानंतर, त्यांच्या एका मुलाचा बीसीसीएलच्या सेंट्रल हॉस्पिटल कोव्हिड-सेंटरमध्ये मृत्यू झाला, तर दुसर्या मुलाचा मृत्यू पीएमसीएचमध्ये झाला. यानंतर, एका मागून एक तब्बल 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. भारतातील अशी ही पहिली घटना आहे, ज्यात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आणि कुटुंबातील इतर सदस्यही आजारी आहेत.
रुग्णालयात चिमुकल्यावर आली स्ट्रेचर ढकलण्याची वेळ...
दरम्यान, आईच्या मृत्यूनंतर एक-एक करून पाचही मुलांचा मृत्यू झाला. तर, सहाव्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. धनबादमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, यातील 6 एकाच कुटुंबातील आहे. गेल्या महिन्यात जूनमध्ये ही महिला एका लग्न समारंभाला गेली होती. यासाठी दिल्लीहून कात्रस येथील तिच्या घरी आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली.
देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 11 लाख 55 हजारहून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांतही 37 हजार 140 नवीन रुग्ण सापडले आहेत. 24 तासांत 587 रुग्णांचा मृत्यू झाला, यासह देशातील एकूण मृतांचा आकडा 28 हजार पार झाला आहे.