COVID-19 : कोरोना विषाणूच्या महासाथीला पाच वर्षे पूर्ण; अस्तित्व अद्याप कायम, समूह प्रतिकारशक्ती, लसीकरणामुळे प्रभाव घटला
Five Years Of COVID-19 : कोरोना विषाणूची महामारी आता पाच वर्षांची झाली आहे. लसीकरण आणि समूह प्रतिकारशक्तीमुळे त्याचा प्रभाव कमी झाला असला तरी, विषाणू अजूनही उत्क्रांती करत आहे, त्यामुळे तज्ञांनी त्यावर निगरगट लक्ष ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
वॉशिंग्टन : मागील वर्षाच्या कटुगोड आठवणींना निरोप देत संपूर्ण जगाने नुकतेच नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. चीनमधील वुहानमधून सबंध जगात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या अभूतपूर्व साथीला या वर्षी पाच पूर्ण होत आहेत.