
Flag Code of India : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवताना हे नियम पाळा
मुंबई : भारतीय राष्ट्रध्वज भारतातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा दर्शवतो. हे आपल्या राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे आणि राष्ट्रध्वजाबद्दल सर्वत्र आपुलकी, आदर आणि निष्ठा आहे. भारतीय राष्ट्रध्वज फडकवणे/वापरणे/प्रदर्शन करणे हे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ आणि भारतीय ध्वज संहिता, २००२ द्वारे नियंत्रित आहे.
हेही वाचा: Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहीम काय आहे ? यात कसे सहभागी व्हाल ?
भारतीय ध्वज संहिता, २००२ ची काही ठळक वैशिष्ट्ये
अ) ३० डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये सुधारणा करण्यात आली आणि पॉलिस्टर किंवा मशीनपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाला परवानगी देण्यात आली. आता, राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा यंत्राने बनवलेल्या, कापूस/पॉलिस्टर/लोकर/रेशीम खादीचा असेल.
ब) सार्वजनिक, खासगी संस्था किंवा शैक्षणिक संस्थेचा सदस्य राष्ट्रध्वजाच्या सन्मान आणि प्रतिष्ठा राखून सर्व दिवस आणि प्रसंगी राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतो/प्रदर्शन करू शकतो.
क) भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये १९ जुलै, २०२२ च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आणि भारतीय ध्वज संहितेच्या भाग-II च्या परिच्छेद २.२ चे खंड (xi) खालील कलम बदलले :- (xi) “जेथे ध्वज उघड्यावर प्रदर्शित केला जातो किंवा सामान्य नागरिकाच्या घरावर प्रदर्शित केला जातो तेते तो रात्रंदिवस फडकू शकतो.
हेही वाचा: Tiranga : भारताच्या ध्वजातील तीन रंगांचा अर्थ काय ? अशोकचक्र काय दर्शवते ?
ड) राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असावा. ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर ३:२ असावे.
इ) जेव्हा जेव्हा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला जातो तेव्हा तो सन्मानाचे स्थान व्यापलेला असावा आणि तो सुस्पष्टपणे लावला गेला पाहिजे.
फ) खराब झालेला किंवा विस्कटलेला ध्वज प्रदर्शित केला जाऊ नये.
ग) ध्वज एका मास्टहेडवरून इतर कोणत्याही ध्वज किंवा ध्वजांसह एकाच वेळी फडकवू नये.
ह) ध्वज संहितेच्या भाग III च्या कलम IX मध्ये नमूद केल्यानुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल इत्यादी मान्यवरांशिवाय कोणत्याही वाहनावर ध्वज फडकवू नये.
य) इतर कोणताही ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा वर किंवा शेजारी ठेवू नये.
Web Title: Flag Code Of India Follow These Rules While Hoisting The National Flag On Independence Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..