Independence Day: राष्ट्रध्वज तिरंगा; जाणून घ्या पाकिस्तानसह १५ देशांच्या राष्ट्रध्वजांची नावं

भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणतात तसंच पाकिस्तानसह इतर देशांमध्येही राष्ट्रध्वजाला वेगवेगळी नावं आहेत. जाणून घेऊया पाकिस्तान, चीन, श्रीलंका, बांग्लादेश, अमेरिका, ब्रिटन, फ्रांस सह एकूण १५ देशांच्या राष्ट्रध्वजाची नावं.
Independence Day 2022 - know world countries flag name
Independence Day 2022 - know world countries flag nameesakal

Independence Day: जगभऱ्यात प्रत्येक देशाच्या राष्ट्रध्वजाला त्या देशानं दिलेलं खास नाव आहे. राष्ट्रध्वजासह ( National Flag)देशातील लोकांच्या भावना, प्रतिष्ठा आणि गौरवपूर्ण इतिहास जुडलेला असतो. साधारणता कुठल्याही देशातील राष्ट्रध्वजाला त्या देशाच्या नावाने ओळखलं जातं. उदा. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज किंवा चीनचा राष्ट्रध्वज. मात्र भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणूनच जगभऱ्यात प्रसिद्धी आहे.

जसं भारताच्या राष्ट्रध्वजाला 'तिरंगा' म्हणतात तसंच पाकिस्तानसह इतर देशांमध्येही राष्ट्रध्वजाला वेगवेगळी नावं आहेत. आज आपण जाणून घेऊया पाकिस्तान, चीन, श्रीलंका, बांग्लादेश, अमेरिका, ब्रिटन, फ्रांस सह एकूण १५ देशांच्या राष्ट्रध्वजाची नावं.

ब्राझील - ब्राझील या देशाची राजधानी ब्रासीलिया आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला ऑरिवर्दे (Auriverde)म्हणतात.

टर्की - टर्की या देशाची राजधानी अंकारा ही आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला अलबेरक (Albayrak) म्हणतात.

कतर - कतर या देशाची राजधानी दोहा आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला इन्नाबी (Innabi) म्हणतात.

मलेशिया - मलेशिया ची राजधानी कुआलालम्पुर आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला जालूर जेमिलांग /स्ट्राइप्स ऑफ ग्लोरी (Jalur Gemilang/Stripes of Glory)म्हणतात.

आयरलँड - आयरलँडची राजधानी डबलिन आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला ब्रताश (Bratach)म्हणतात.

न्यूझिलंड - न्यूझिलंडची राजधानी वेलिंगटन आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला इनसाइन (New Zealand Ensign) म्हणतात.

तिब्बत - तिब्बतची राजधानी ल्हासा आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला स्नो लायन फ्लॅग (Snow lion flag) म्हणतात.

रूस - रूसची राजधानी मॉस्को आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला ट्रईकोलोर (Trikolor) म्हणतात.

फ्रांस - फ्रांसची राजधानी पॅरिस आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला फ्रेंच ट्रायकलर (French Tricolor) म्हणतात.

ब्रिटन - ब्रिटनची राजधानी लंडन आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला यूनियन जॅक किंवा यूनियन फ्लॅग (Union Jack or Union Flag) म्हणतात.

अमेरिका - अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला स्टार्स अँड स्ट्राइप्स किंवा स्टार स्पैंगल्ड बॅनर किंवा ओल्ड ग्लोरी (Stars and Stripes, Old Glory, Star-Spangled Banner) म्हणतात.

श्रीलंका - श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला लॉयन फ्लॅग आणि सिन्हा फ्लॅग म्हणतात.

बांग्लादेश - बांग्लादेशची राजधानी ढाका आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला लाल सॉब्ज (Lal Sobuj) म्हणतात.

चीन - चीनची राजधानी बीजिंग आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला वू शिंग होंग की (Wǔ Xīng Hóng Qí) म्हणतात.

पाकिस्तान - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे. या देशातील राष्ट्रध्वजाला परचम - ए-सितारा ओ- हिलाल (Parc̱am-e Sitārah o-Hilāl) म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com