बिहारमध्ये महापुराचा हाहा:कार; दहा जिल्ह्यातील १० लाख नागरिकांना फटका

उज्ज्‍वल कुमार
Sunday, 26 July 2020

बिहारमध्ये महापुराने हाहा:कार माजवला असून दहा जिल्ह्यातील १० लाख नागरिकांना फटका बसला आहे. गंडक नदीवरील गोपाळगंज, पूर्व चंपारणमधील तीन बंधारे फुटल्याने सर्व परिसर जलमय झाला. पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्नधान्य पोचवण्यासाठी हवाई दलाची मदत घेतली जात आहे. हवाई दलाचे तीन हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात जेवणाच्या पाकिटाचे वितरण करत आहेत.

पाटणा - बिहारमध्ये महापुराने हाहा:कार माजवला असून दहा जिल्ह्यातील १० लाख नागरिकांना फटका बसला आहे. गंडक नदीवरील गोपाळगंज, पूर्व चंपारणमधील तीन बंधारे फुटल्याने सर्व परिसर जलमय झाला. पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्नधान्य पोचवण्यासाठी हवाई दलाची मदत घेतली जात आहे. हवाई दलाचे तीन हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात जेवणाच्या पाकिटाचे वितरण करत आहेत. दोन हेलिकॉप्टर दरभंगा आणि मोतिहारी भागात तर तिसरे हेलिकॉप्टर पाटण्याहून गोपालगंज येथे साधनसामग्री पोचवत आहेत. पूरग्रस्तांसाठी कम्युनिटी किचन चालवण्यात येत असून तेथे ११ लाखाहून अधिक नागरिकांच्या भोजनाची सोय केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने काल हवाई दलाकडे हेलिकॉप्टरची मागणी केली होती. त्यानुसार आज पूरग्रस्त भागात मदतीची पाकिटे खाली टाकण्यात आली. सर्व भाग पाण्याखाली गेल्याने  दरभंगा-समस्तीपूर लोहमार्गावरील वाहतूक बंद आहे. आपत्ती निवारण विभागाच्या माहितीनुसार राज्यातील दहा जिल्ह्यांमधील ४३५ गावांमधील सुमारे आठ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. १९२ ठिकाणी सामूहिक स्वयंपाकघर सुरू करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमधून फुटलेल्या बंधाऱ्यांची पाहणी केल्याचे जलस्त्रोत मंत्री संजय झा यांनी सांगितले. गोपाळगंज जिल्ह्यातील बकहा आणि देवापूर आणि चंपारण जिल्ह्यातील संग्रामपूरमधील स्थिती नियंत्रणात आहे.

कार्यकारी अभियंता निलंबित
पूरस्थितीच्या काळात पूर्व चंपारणमधील जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्याचा मोबाईल बंद असल्याने त्याला तातडीने निलंबित केल्याचे झा यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood in Bihar ten lakh citizens in ten districts hit