Northeast India Floods : ईशान्य भारतात महापूराचा कहर;पूरस्थिती अद्याप कायम, मदतकार्य वेगात सुरू,१२ जणांचा मृत्यू
Monsoon Update 2025 : ईशान्य भारतात पावसामुळे निर्माण झालेल्या पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अरुणाचलमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. डोंगराळ भागांत भूस्खलन होत असून अनेक खेडी संपर्कविहीन झाली आहेत.
अरुणाचल प्रदेशात पावसामुळे झालेल्या विविध घटनांत बारा जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील २१४ खेड्यातील सुमारे ३३,२०० नागरिकांना भूस्खलन आणि महापुराचा सामना करावा लागला आहे.