साैंदत्ती, रामदुर्ग या दुष्काळी पट्ट्यात पुरामुळे मोठी पडझड

साैंदत्ती, रामदुर्ग या दुष्काळी पट्ट्यात पुरामुळे मोठी पडझड

बेळगाव - कमी पाऊस आणि सातत्याने दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्यात पुरामुळे मोठी पडझड झाली आहे.  यंदा प्रथमच नवलतीर्थ धरण भरले.यामुळे यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पाण्यामुळे रामदुर्ग आणि साैेदत्ती तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली. या पुरात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वीजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. 

खानापूर तालुक्यात उगम पावणाऱ्या मलप्रभा धरणावर 1974 मध्ये साैंदत्तीजवळ नवलतीर्थ धरण उभारण्यात आले. त्यानंतर 44 वर्षात हे धरण एकदाही पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे  धरणातून पावसाळ्यात पाणी सोडण्याची कधी गरजही भासली नाही. साैंदत्ती परिसरातील एकाही गावाला कधीही पुराचा सामना करावा लागला नाही. मात्र बेळगाव खानापूर व इतर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरण 100 टक्के भरले. गेल्या आठ दिवसात धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास एक लाख 25 हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने या भागात पुरस्थिती निर्माण झाली. येथील नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली

पावसाचा जोर ओसरल्यानंतरही येथील पुरस्थिती कमी झालेली नाही. मुन्नोळी गावातील नदी काठची सर्व दुकाने पुरात वाहून गेली आहेत. तसेच वीजचे खांब तुटून पडले आहेत. संपूर्ण हेस्कॉमचे सब स्टेशन पाण्यात गेले आहे. त्यामुळे 50 हुन अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. अजून 8 ते 10 दिवस वीज पुरवठा होऊ शकणार नाही, असे हेस्कॉमतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

धरण भरणार असल्याची माहिती देण्यात आली होती, मात्र रात्री अचानक पाणी सोडण्यात आल्याने घरातून बाहेर पडताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. कधीही मोठया प्रमाणात पाऊस पडत नाही. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. 

- शैलजा कदम, रहिवासी मुन्नोळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com