पॉझिटिव्ह केसेस वाढल्या पाहिजेत; मोदींचा व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान मोदी पॉझिटिव्ह केसेस वाढविण्याबाबत बोलत आहेत. जे डोक्यात असते तेच बोलण्यातून बाहेर पडतं, असा खरमरीत टोला काँग्रेसने मोदींना लगावला आहे.
PM Modi
PM ModiFile photo
Summary

पंतप्रधान मोदी पॉझिटिव्ह केसेस वाढविण्याबाबत बोलत आहेत. जे डोक्यात असते तेच बोलण्यातून बाहेर पडतं, असा खरमरीत टोला काँग्रेसने मोदींना लगावला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमण (Corona Pandemic) वाढत आहे, त्यातच आता तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक राज्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींकडून एक चूक झाल्याने काँग्रेसने (Congress) त्यांच्यावर निशाणा साधला आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह केस वाढल्या पाहिजेत, असे मोदींनी यावेळी म्हटले आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे. (Focus on increasing covid-19 positive cases says PM Modi Video Viral)

PM Modi
कोरोनाचं 'मृत्यूतांडव'; 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक बळी

जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, 'कोरोना पॉझिटिव्ह केसेस झपाट्याने वाढल्या पाहिजेत. तसेच टेस्टही वाढल्या पाहिजेत. या सर्व गोष्टींवर आपल्याला भर द्यायला हवा.' काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी पॉझिटिव्ह केसेस वाढविण्याबाबत बोलत आहेत. जे डोक्यात असते तेच बोलण्यातून बाहेर पडतं, असा खरमरीत टोला काँग्रेसने मोदींना लगावला आहे.

पंतप्रधान पॉझिटिव्ह केसेस वाढविण्याचा प्रयत्न करण्याबाबत बोलतच नाहीत. तर पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारावेळी मोठी गर्दी जमवत याचं उदाहरणही दिलं आहे. तसंही जीभेवर तिच गोष्ट येते जी डोक्यात सुरू असते, अशा आशयाचं ट्विट काँग्रेसने केले आहे.

PM Modi
'अभ्यास करुन डोकं खराब झालंय'; चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

टेलिप्रॉम्प्टर बघूनही मोदींना नीट वाचता येत नाही, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे. पंतप्रधानांची जीभ घसरली तर समजून जा की आपल्या हातातून सगळं निघून गेलं आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा. सरकारकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका, असं दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं आहे. सोशल मीडियात मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नागरिकांनी मोदींवर टीकेची झोड उठवली आहे.

लसीकरण हेच कोरोनाला रोखण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. आणि सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागाकडे लक्ष द्यावे लागेल. जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. जेव्हा जिल्हा कोरोनामुक्त होईल, तेव्हा देशही कोरोनामुक्त होईल, असंही मोदी म्हणाले.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com