
पाश्चात्त्य देशांसोबत राजनैतिक संबंध मजबूत करणे, ही डॉ. मनमोहन सिंग यांची निर्णायक आणि ऐतिहासिक कामगिरी होती. त्याबाबत त्यांचे काँग्रेसकडून वा यूपीएकडून जेवढे कौतुक झाले नाही, त्याहून अधिक पाश्चात्त्य देशांकडून झाले. डॉ. सिंग यांचे परराष्ट्रीय धोरणांबाबतचे काम हे १९९१ च्या आर्थिक सुधारणांपेक्षाही अधिक आव्हानात्मक होते.