कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना टाटा समूहाकडून आहाराची व्यवस्था

food arrangements by the Tata group for doctors treating corona
food arrangements by the Tata group for doctors treating corona
Updated on

मुंबई : देशातील लॉकडाऊन परिस्थिचा फटका कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ही बसला होता. रूग्णालयातील आहार केंद्र बंद झाल्याने डॉक्टरांपुढे खाण्या-पिण्याचा प्रश्न उद्भवला होता. डॉक्टरांची ही निकड लक्षात घेऊन टाटा उद्योग समूहाकडून कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य सेवकांना जेवण पुरवण्यात येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टाटांकडून गेल्या आठ दिवसांपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. राज्य सरकार तसेच पालिकेच्या सेंट जॉर्ज, जेजे, कस्तुरबा, केईएम, सेव्हन हिल, भाभा रुग्णालयासह इतर रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयांत दीड हजारांहून अधिक डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य सेवक बाधितांवर उपचार करत आहेत. मात्र ही सेवा देत असतांना लॉकडाऊन मुळे त्यांच्या खाण्या-पिण्याची समस्या उत्पन्न झाली होती.

Coronavirus : एका दिवसात महाराष्ट्रातील आकडा १२ने वाढला; कोणत्या ठिकाणी किती वाढले रुग्ण

ही समस्याच लक्षात घेऊन टाटा उद्योग समूहाने स्वता पुढाकार घेऊन या सर्वांना आहाराची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठ दिवसांपासून टाटा समूहाकडून 2 वेळचे जेवण पूरवण्यात येत आहे. देशावर आलेल्या संकटाच्या, आपत्तीच्या काळात टाटा उद्योगसमूह नेहमीचं देशाच्या मदतीला धाऊन आला आहे. देशावर कोरोना विषाणूचं अभूतपूर्व संकट आलं आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी टाटा समूहाने दीड हजार कोटी रुपयाची तातडीची आर्थिक मदत देऊ केली आहे. यासंदर्भात टाटा उद्योगसमूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सध्याचा अभूतपूर्व कठीण काळ असल्याचं सांगत, कोविड-19 विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com