Coronavirus : महाराष्ट्रातील आकडा १२ने वाढला; कोणत्या ठिकाणी किती वाढले रुग्ण?

वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

भारतात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १०२४ झाली असून त्यापैकी महाराष्ट्रात २१५ झाली आहे. महाराष्ट्रात आज (ता.३०) एका दिवसात १२ रुग्णांची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

पुणे : जगभरात कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. भारतात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १०२४ झाली असून त्यापैकी महाराष्ट्रात २१५ झाली आहे. महाराष्ट्रात आज (ता.३०) एका दिवसात १२ रुग्णांची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात वाढलेल्या १२ रुग्णांपैकी पुण्यात ५, मुंबईत ३, नागपूरमध्ये २, तर कोल्हापूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची वाढ झाली आहे. काल (ता.२९) महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २०३ होती. त्यामध्ये आता एकूण १२ कोरोनाग्रस्त रूग्णांची वाढ झाली असून ती संख्या आता २१५ वर पोहोचली आहे. काल (ता.२९) पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील ०५ रुग्णांना एकाच दिवशी डिस्चार्ज दिला. गेल्या ०९ दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये एकही रुग्ण सापडलेला नसून तिथिल एकूण ०८ रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. परंतु, पुण्यात आज (ता.३०) ०५ रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.

दिल्लीतील शाहीनबागमध्ये भीषण आग

दरम्यान, भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांपैकी आतापर्यंत एकूण २७ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये या विषाणूचा पहिला बळी शनिवारी नोंदविला गेला. गुजरातेत करोनामुळे एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला आहे. काल रविवारी एकाच दिवशी देशभरात कोरोनाच्या बळींची संख्या ०५ ने वाढली असून ही चिंताजनक बाब आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total number of Coronavirus cases in the state rises to 215