‘अग्निपथ’ला विरोध : विद्यार्थी रस्त्यावर; रास्ता अन् रेल रोको आंदोलन

केंद्राच्या या योजनेविरोधात आज तीनही राज्यांमध्ये अनेक ठिकाणांवर जोरदार आंदोलन करण्यात आले.
for army recruitment launch Agnipath Scheme protest of bihar rajasthan uttar pradesh
for army recruitment launch Agnipath Scheme protest of bihar rajasthan uttar pradesh M.ASOKAN

लखनौ-पाटणा : लष्करातील भरतीसाठी केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली खरी पण या योजनेला आता बिहार, राजस्थान आणि उत्तरप्रदेशातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. केंद्राच्या या योजनेविरोधात आज तीनही राज्यांमध्ये अनेक ठिकाणांवर जोरदार आंदोलन करण्यात आले. बिहारच्या बक्सरमध्ये आंदोलकांनी रेल रोको केला तर मुजफ्फरपूर येथील माडीपूर या ठिकाणी आंदोलकांनी गाड्यांना आगी लावत रास्ता रोको आंदोलनही केले. आरा जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण तरुण हे आंदोलनावर ठाम आहेत.

‘यूपी’च्या आंबेडकरनगरमध्ये अनेक युवक संघटनांनी आंदोलन केले. राजस्थानच्या जयपूरमध्येही शेकडो युवक रस्त्यांवर उतरले होते. या प्रस्तावित योजनेला सरकारने स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. दुसरीकडे माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीयमंत्री जनरल व्ही.के.सिंह यांनी आपल्याला या योजनेबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगत त्याबाबत अधिक भाष्य करण्यास नकार दिला. बिहारच्या बक्सर, आरा, मुझफ्फरपूर, बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार आंदोलन करण्यात आले. मुझफ्फरपूरमध्ये लष्कर भरतीची तयारी करणारे विद्यार्थी लाठ्या- काठ्या घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी आर्मी रिक्रुटमेंट कार्यालयाच्याबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी यावेळी रस्त्याच्या लगत लावण्यात आलेले बोर्ड आणि होर्डिंग्ज यांची देखील मोडतोड केली. बक्सरमध्ये रेलरोको आंदोलन करण्यात आले. बेगुसरायमध्ये ‘राष्ट्रीय महामार्ग-३१’ वरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. केंद्र सरकार परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी नोकरी देईल पण चार वर्षांनंतर ७५ टक्के जवानांना ११ लाख रुपये देऊन घरी पाठविण्यात येईल. केवळ २५ टक्के उमेदवारांच्या नोकरीमध्ये काही विस्तार होईल, यालाच आमचा आक्षेप असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

सध्या देश दोन्ही आघाड्यांवर मोठ्या आव्हानांना सामोरे जात असतानाच अनावश्यक ‘अग्निपथ’ योजनेमुळे सुरक्षा दलांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होईल. भाजप सरकारने आमच्या सुरक्षा दलांची प्रतिष्ठा, परंपरा, शौर्य आणि शिस्त यांच्याशी तडजोड करू नये.

- राहुल गांधी, नेते काँग्रेस

मागील वर्षी लष्कर भरतीची प्रक्रिया झाली होती. अनेक विद्यार्थ्यांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीही झाली होती. आता एक वर्षापासून आम्ही लेखी परीक्षा कधी होणार याची वाट पाहात आहोत. सरकारने आतापर्यंत परीक्षाच घेतलेली नाही.

- अंकित सिंह, आंदोलक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com