esakal | परदेशातून मदतीचा ओघ, पण ती राज्यांना देण्यास केंद्रानं केला उशीर!

बोलून बातमी शोधा

sakal media
परदेशातून येणारी मदत राज्यांना वेळेत मिळेना!
sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असून अत्यंत भयंकर स्थितीतून देश सध्या जात आहे. देशात आरोग्य सुविधांची पूर्णपणे वाणवा आहे. ऑक्सिजन बेड्स, आयसीयू, ऑक्सिजनचा तुटवडा प्रत्येक राज्यात जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी लोकांनी तडफडून आपला जीव सोडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. त्यात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जगभरातील देश भारताला मदत पाठवत आहेत. पहिली मदत मिळाल्यानंतर त्यासाठी एसओपी Standard Operating Procedure (SOP) ठरवण्यासाठी केंद्राने सात दिवस लावल्याचे समोर आले आहे. (Foreign Covid aid reached India on April 25 Centre took 7 days to notify SOP)

देशात कोरोनाचा हाहाकार सुरु झाल्यानंतर आरोग्य सुविधा कमी पडू लागल्या. त्यावेळी जगभरातील जवळपास ४० देशांनी मदतीसाठी हात पुढे केला. ऑक्सिजन निर्मिती यंत्र, कॉन्सेट्रेटर, व्हेंटिलेटर अशी मदत अनेक देशांकडून परराष्ट्र मंत्रालयाला मिळाली आहे. पहिली मदत सिंगापूरकडून २५ एप्रिलला मिळाली होती. पण, हे जीव वाचवणारे उपकरणं राज्यांमध्ये कशी वाटप करायची हे ठरवण्यासाठी केंद्राने सात दिवस घेतले. विशेष म्हणजे याच काळात हॉस्पिटल्संना या उपकरणाची सर्वाधिक आवश्यकता होती. हजारो लोकांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत होता. 'इंडिया टूडे'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

हेही वाचा: भारत कोरोनाच्या विळख्यात; अमेरिका, यूके आणि जर्मनीकडून मदत

इंडिया टूडेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलंय की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही मदत २ मेपासून राज्यांना वाटण्यास सुरुवात केली. सरकारने जगभरातील देशांकडून मदत स्वीकारण्यास सुरुवात केली. शिवाय पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना फोन करुन मदत मागितली होती. पण, ही मदत लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्राने उशीर केल्याच स्पष्ट होतंय.