

Foreign Funding Under ED Scanner: Two Overseas Firms Suspected in ₹14 Crore Money Trail
esakal
भारताच्या अंतर्गत घडामोडींमध्ये कथित हस्तक्षेप आणि संशयास्पद परदेशी आर्थिक व्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दोन परदेशी संस्थांविरोधात तपास सुरू केला आहे. भारताशी संबंधित एका ब्रिटिश कंपनीच्या खात्यात फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान 10 लाख डॉलर (सुमारे ₹9.41 कोटी) जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे.
याशिवाय कॅनडातील एका संस्थेकडूनही त्याच कंपनीला 5 लाख डॉलर (सुमारे ₹4.71 कोटी) पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही व्यवहारांची एकूण रक्कम 15 लाख डॉलर (सुमारे ₹14.12 कोटी) आहे.