India-Canada: 'कट्टरतावाद, संघटित गुन्हेगारी, दहशतवाद..'; एस जयशंकर यांचा कॅनडावर हल्लाबोल

एस जयशंकर यांचा कॅनडावर विधान...
New India Able to face border challenges S Jaishankar
New India Able to face border challenges S Jaishankarsakal

नवी दिल्ली- भारतावर गंभीर आरोप करणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांवर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जोरदार घणाघात केला. खलिस्तानवादी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी जस्टिन ट्रूडो यांनी केंद्र सरकारवर आरोप केला होता. यावरुन जयशंकर म्हणाले की, 'भारत सरकारची ही नीती कधीही राहिलेली नाही. कॅनडाकडून या संगर्भात योग्य पुरावे मिळण्याची आम्ही वाट पाहतोय.'

निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केलाय. त्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही सरकारकडून आपल्या देशातील राजदूतांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात एस जयशंकर यांनी न्यूयॉर्क येथे बोलताना कॅनडा सरकारवर टीकास्त्र सोडले. (Foreign Minister S Jaishankar has reacted sharply to Canada Prime Minister Justin Trudeau)

New India Able to face border challenges S Jaishankar
India-Canada: भारत कॅनडा वादामुळे महागाई वाढणार? अशाप्रकारे बिघडू शकते तुमचे आर्थिक गणित

आम्ही कॅनडा सरकारला कळवलं आहे की अशा प्रकारे कृती करण्याची आमची पॉलिसी नाही. तुमच्याकडे यासंदर्भात काही विशिष्ट माहिती असेल तर आम्हाला कळवा. कॅनडाने यात काही महत्त्वाचं आमच्याकडे पुरवलं तर याप्रकरणात लक्ष घालू, असं जयशंकर म्हणाले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये कॅनडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विभाजनवादी शक्ती काम करत आहेत. कॅनडामध्ये संघटित गुन्हेगारी वाढत आहे. हिंसाचार, कट्टरतावाद हे कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भारत कॅनडाला दहशतवाद्यांची माहिती पुरवत आहे. अनेक दहशतवादी कॅनडाच्या जमिनीवरुन भारत विरोधी काम करत आहेत.दहशतवाद्यांच्या हस्तांतरणाची आम्ही मागणी केली आहे, असं ते म्हणाले.

New India Able to face border challenges S Jaishankar
India-Canada: आधी आग लावायची अन् पुन्हा विझवायला यायचं; भारत-कॅनडा वादात अमेरिकेची मध्यस्थी?

भारतीय राजदुतांना कॅनडामध्ये धमकी दिल्या जात असल्याचा विषय गंभीर असल्याचं जयशंकर म्हणाले. सध्या अशी परिस्थिती आहे की भारताचे राजनैतिक अधिकारी आणि राजदूत यांना धमकावले जात आहे.त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप केला जात आहे, असंही ते म्हणाले.

कॅनडाने केलेल्या आरोपामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडले आहेत. कॅनडाने केलेले आरोप भारत सरकारने फेटाळून लावले आहेत. असे असले तरी जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप सुरुच ठेवलेत. भारतानेही कठोर पवित्रा घेतला असून कॅनडा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान झाला असल्याची टीका केलीये. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com