S. Jaishankar : भारताच्या प्रत्युत्तराने दाखवून दिलं की...; जयशंकर यांचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

S Jaishankar

S. Jaishankar : भारताच्या प्रत्युत्तराने दाखवून दिलं की...; जयशंकर यांचं मोठं विधान

चेन्नई : पाकिस्तानकडून निर्माण होणारा दहशतवाद आणि चीनशी झालेल्या संघर्षाला दिलेल्या प्रत्युत्तरामुळे भारत देश कोणासमोरही झुकणार नाही, हे स्पष्ट झाल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. बालाकोट एअर स्ट्राईकच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आपल्याकडून देण्यात आल्याचं ते म्हणाले. (S. Jaishankar news in Marathi)

हेही वाचा: KCR : मोदींवर टीका करा, हरकत नाही पण...; केंद्रीयमंत्र्यांचा केसीआर यांना इशारा

'तुघलक' या तामिळ साप्ताहिकाच्या ५३ व्या वर्धापन दिनाला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री म्हणाले, 'चीन आज उत्तरेकडील सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य आणून आपल्या सीमेचे उल्लंघन करून यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कोव्हिड-19च्या काळात देखील आपण भक्कमपणे सीमेवर लक्ष ठेवून होतो. हजारोच्या संख्येने तैनात असलेल्या आमच्या जवानांनी दुर्गम भागात आपल्या सीमेचे रक्षण केले आहे आणि ते अजूनही पूर्ण तयारीने सीमेचे रक्षण करत आहेत.

हेही वाचा: Crime News : पाळीव कुत्र्यावरुन वाद ! घरासमोर येताच फेकलं अ‍ॅसिड अन्...

राष्ट्रीय समृद्धीचे अनेक पैलू आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षा हा निःसंशयपणे मूळ पाया आहे. या संदर्भात सर्व देशांची चाचपणी केली जाते, पण आपल्याकडे दहशतवादापासून सीमेपलीकडील दहशतवादापर्यंत अनेक समस्या होत्या. मात्र बालाकोट एअर स्ट्राईकने या सर्व कारवायांना आवश्यक तो संदेश दिल्याचं जयशंकर यांनी म्हटलं. जयशंकर म्हणाले की, भारत हा असा देश आहे जो कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही आणि आपल्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

टॅग्स :PakistanChinaIndia