
ओडिशात एका वन अधिकाऱ्याकडे कोट्यवधींच्या बेहिशोबी रकमेसह सोने, चांदी आणि इतर मालमत्तेची कागदपत्र आढळून आली आहेत. दक्षता विभागाने छापा टाकताच वन अधिकाऱ्याकडे एका गुप्त तिजोरीत हे घबाड सापडलं. १.४३ कोटींची रोकड, १.३२ कोटींच्या एफडी, दीड किलो सोनं, साडे चार किलो चांदी, इतर ठिकाणी घरं आणि जमीनीची कागदपत्रं सापडल्यानं खळबळ उडाली आहे.