माजी विधानसभा अध्यक्षांनी गळफास घेऊन आत्महत्या केली; कारण...

वृत्तसंस्था
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

आंध्र प्रदेश विधानसभा माजी अध्यक्ष कोडेला शिव प्रसाद राव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याची अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे. 

हैद्राबाद : आंध्र प्रदेश विधानसभा माजी अध्यक्ष कोडेला शिव प्रसाद राव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याची अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे. 

गेल्या बऱ्याच दिवसांपासून राव काही प्रकरणांशी झगडत होते. यामुळे ते नैराश्यातही होते. याच कारणातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी, अलिकडील राजकीय घडामोडींमुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते असेही बोलले जात होते. वायएसआर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर शिवप्रसाद यांचा मुलगा आणि मुलीवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटले दाखल करण्यात आले. हे प्रमुख कारण त्यांच्या आत्महत्येमागे असल्याचेही सांगितले जात आहे. याचदरम्यान, विधानसभेतील फर्निचरचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि त्यांनी या धक्क्यानेच त्यांनी आत्महत्या केली.

दरम्यान, राव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना गंभीर परिस्थितीत हैदराबादमधील इंडो अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल आलं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोडेला शिव प्रसाद राव हे तेलुगू देसम पक्षाचे नेते होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former AP speaker Kodela Siva Prasad Rao commits suicide in Hyderabad