

Former Army Chief Naravane’s Unpublished Book Sparks Chaos in Lok Sabha
esakal
सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना राहूल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे (निवृत्त) यांच्या एका अप्रकाशित पुस्तकातील आठवणीचा उल्लेख केला. यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी नियमांचा हवाला देत अप्रकाशित पुस्तकांचा संदर्भ देण्यास तीव्र विरोध केला. या घटनेनंतर नरवणे आणि त्यांचे पुस्तक पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, काँग्रेसने पुस्तकातील काही मजकूर सोशल मीडियावर शेअर केल्याने वाद अधिक तीव्र झाला आहे.