esakal | Breaking: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई काळाच्या पडद्याआड
sakal

बोलून बातमी शोधा

Tarun_Gogoi

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची विचारपूस केल्याची माहिती गोगोई यांचे पुत्र गौरव यांनी दिली होती.

Breaking: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई काळाच्या पडद्याआड

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

गुवाहाटी (आसाम) : आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई (वय ८४) यांचे सोमवारी (ता.२३) निधन झाले. दुपारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती गौहती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे (जीएमसीएच) पर्यवेक्षक अभिजित शर्मा यांनी दिली होती. मल्टी-ऑर्गन डिसफंक्शनने ग्रस्तअसल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गुवाहाटीमधील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

डिसेंबरमध्ये होऊ शकतो कोरोनाचा कहर; सर्वोच्च न्यायालयाने मागितला चार राज्यांकडून रिपोर्ट​

तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री असलेले गोगोई यांची राजकीय कारकीर्द ५० वर्षांहून अधिक काळ राहिली आहे. या काळात त्यांनी कॉंग्रेस पक्ष, केंद्र सरकार तसेच आसामच्या राज्य प्रशासनातही वेगवेगळी पदे भूषवली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची विचारपूस केल्याची माहिती गोगोई यांचे पुत्र गौरव यांनी दिली होती. गोगोई यांच्यावर नऊ डॉक्टरांचे पथक उपचार करीत होते. मात्र, उपचाराला त्यांचे शरीर साथ देत नव्हते. गोगोई यांचे अवयव काम करेनासे झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर त्यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ४ प्रश्न; कोणते ते वाचा सविस्तर​

गोगोई यांना कोरोना झाल्याने ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या अनेक समस्या उद्‍भवल्या. डायलेसिसनंतर गोगोई यांची प्रकृतीत किंचित सुधारणा झाली होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती आसामचे आरोग्य मंत्री हेमंत विश्‍व शर्मा यांनी दिली.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image