esakal | राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ४ प्रश्न; कोणते ते वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul_Gandhi

ब्रिटिश कंपनी अ‍ॅस्ट्रॉजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची भारतात चाचणी घेण्यात येत आहे. याबरोबरच आठ भारतीय कंपन्या कोरोना लसीच्या निर्मितीत गुंतल्या आहेत.

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ४ प्रश्न; कोणते ते वाचा सविस्तर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना लसीबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न त्यांनी ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीबाबत भारतीयांसाठी कोणत्या कंपन्यांची निवड केली आहे आणि त्यांना निवडण्याचे कारण काय आहे हे सांगावे? असे विचारले आहे. 

डिसेंबरमध्ये होऊ शकतो कोरोनाचा कहर; सर्वोच्च न्यायालयाने मागितला चार राज्यांकडून रिपोर्ट​

दुसरे म्हणजे ही कोरोना लस सर्वप्रथम कुणाला दिली जाईल आणि या कोरोना लसीच्या वितरणासाठी सरकारने कोणती योजना तयार केली आहे? पीएम केअर्स फंडातील रक्कम कोरोना लसीसाठी वापरला जाईल का? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. तसेच १३० कोटी भारतीयांना कधीपर्यंत लसीकरण केले जाईल, असेही गांधींनी विचारले आहे. 

ब्रिटिश कंपनी अ‍ॅस्ट्रॉजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची भारतात चाचणी घेण्यात येत आहे. याबरोबरच आठ भारतीय कंपन्या कोरोना लसीच्या निर्मितीत गुंतल्या आहेत. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या आघाडीवर आहेत. भारत बायोटेकची कोवॅक्सिन 'आयसीएमआर'च्या सहकार्याने विकसित केली जात आहे.

Covid-19: कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस भारतात कधी मिळणार? 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी देशभरातील कोरोनाच्या परिस्थितीवरून सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. तसेच ही परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार कमी पडत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्राने अनेक चुकीचे निर्णय घेतले. यामध्ये लॉकडाउनचाही समावेश आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात वाढत्या रुग्णसंख्येवरूनही त्यांनी सरकारला घेरले आहे.

'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​ 

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)