

Khaleda Zia Dies Before Being Flown Abroad For Treatment
Esakal
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचं निधन झालं. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख खालिदा जिया यांच्यावर ढाक्यातील एवर केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. खालिदा जिया यांच्या पक्षानं त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली.