Karnataka Election News : भाजपचे माजी उपमुख्यमंत्री काँग्रेसमध्ये दाखल; डीके शिवकुमार यांनी केली मोठी घोषणा

Former BJP leader former Karnataka Deputy CM Laxman Savadi has joined Congress says DK Shivakumar
Former BJP leader former Karnataka Deputy CM Laxman Savadi has joined Congress says DK Shivakumar

कर्नाटक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यादरम्यान भाजपचे माजी नेते आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी याची घोषणा केली. (Karnataka Election News)

लक्ष्मण सवदी यांनी बेंगळुरूमध्ये 12 एप्रिल रोजी विधान परिषद सदस्यपदाचा आणि अथणी मतदारसंघाचे तिकीट गमावल्यानंतर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Former BJP leader former Karnataka Deputy CM Laxman Savadi has joined Congress says DK Shivakumar
Video : जन्मदात्या आईनेही सोडली एन्काउंटर झालेल्या 'गुलाम'ची साथ, म्हणली…

कर्नाटकातील अथणी मतदारसंघातून तिकीट न दिल्यामुळं नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर लक्ष्मण सवदी म्हणाले होते की, 'मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. भिकेचा कटोरा घेऊन फिरणारा मी नाही. मी एक स्वाभिमानी राजकारणी आहे.'

Former BJP leader former Karnataka Deputy CM Laxman Savadi has joined Congress says DK Shivakumar
Video : पैशांचा पाऊस… चक्क ऑटो रिक्षात सापडंलं एक कोटींचं घबाड

भाजपनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे त्यांच्या पारंपारिक शिग्गाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, त्यांच्या सरकारमधील मंत्री आर अशोक कनकपुरा मतदारसंघातून काँग्रेस नेते डीके शिवकुमार आणि दुसरे मंत्री व्ही सोमन्ना वरुणा विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुध्द निवडणूक लढवणार आहेत.

भाजपने 52 नवे चेहरे निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. 189 उमेदवारांच्या यादीत 32 इतर मागासवर्गीय (OBC) आहेत, तर 30 अनुसूचित जाती आणि 16 अनुसूचित जमातीचे आहेत. उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण आठ महिलांना स्थान मिळालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com