esakal | लालू प्रसाद यांना पुन्हा जामीन नाकारला 
sakal

बोलून बातमी शोधा

Lalu Prasad Yadav

न्यायाधीश अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठात लालूंच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. चारा गैरव्यवहारातील सर्वांत मोठे प्रकरण असलेल्या डोरंडा कोषागरासंबंधीची सुनावणी न्यायालयात पुन्हा सुरू झाली आहे.

लालू प्रसाद यांना पुन्हा जामीन नाकारला 

sakal_logo
By
पीटीआय

रांची - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन नाकारला. चारा गैरव्यवहारातील दुमका कोषागर प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नाही. याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. पुढील सुनावणी येत्या १९ रोजी होणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुमका कोषागारातून अवैधरीत्या निधी काढल्याच्या आरोपावरून लालू प्रसाद यादव २०१७ पासून तुरुंगात आहेत. न्यायाधीश अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठात लालूंच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. चारा गैरव्यवहारातील सर्वांत मोठे प्रकरण असलेल्या डोरंडा कोषागरासंबंधीची सुनावणी न्यायालयात पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, लालू प्रसाद यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी गुरुवारी (ता. ११) ५० हजार पोस्टकार्ड राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविली. मानवतेच्या दृष्टिकोनातून लालू प्रसाद यादव यांची तुरुंगातून सुटका करावी, अशी विनंती त्यात केली होती. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा