

Former Chief Justice of India BR Gavai raises concerns over Supreme Court Collegium recommendations and judicial appointments in a letter to President Droupadi Murmu
esakal
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि कॉलेजियमच्या कार्यपद्धतीवरून देशाच्या न्यायव्यवस्थेत नवा वाद निर्माण झाला आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या अलीकडील शिफारशींवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये एका विशिष्ट समुदायाला प्राधान्य दिले जात असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, महिला आणि इतर पात्र उमेदवारांना पुरेशी संधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पत्राची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही पाठवण्यात आली आहे.