esakal | कोरोनामुळे माजी मुख्यमंत्र्यांचेही हाल; उपचारासाठी मिळेना बेड
sakal

बोलून बातमी शोधा

HD Kumaraswamy

कोरोनामुळे माजी मुख्यमंत्र्यांचेही हाल; उपचारासाठी मिळेना बेड

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

बंगळूर : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनीना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचाही कोविड चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. आरोग्यमंत्री सुधाकर यांच्या हस्तक्षेपानानंतरही त्यांना मणिपाल रूग्णालयात जागा मिळाली नाही. कुमारस्वामी यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे ट्विटरवरून जाहीर करतानाच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणी करवून घेण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: कोरोना फोफावतोय! २४ तासात आढळले २.६१ लाख नवे रुग्ण

त्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी बंगळूरला परत आल्यानंतर त्यांना थकवा आला होता. त्यामुळे थेट घरी जाण्याऐवजी ते एका खासगी हॉटेलमध्ये ते थांबले. येथे चाचणी घेतली असता त्याचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे कुमारस्वामी यांनी मणिपाल रुग्णालय गाठले. मात्र, येथे खाटा उपलब्ध नव्हत्या. आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधूनही काही करता आले नाही. त्यांना बंगळूरच्या बाहेरील फार्म हाऊसमध्ये राहायचे होते, पण कुमारस्वामींना इतर आजार असल्याने डॉक्टरांनी गृह विलगीकरणासाठी नकार दिला. काही दिवसांपूर्वी कुमारस्वामींच्या हृदयाचे ऑपरेशन झाले आहे. नंतर त्यांना बन्नरघट्ट रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कुमारस्वामी बसवकल्याणमध्ये पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करत होते.