'इसिस काश्मीर'कडून गंभीरला जीवे मारण्याची धमकी; घराची सुरक्षा वाढवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Gambhir

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला 'इसिस काश्मीर' या संघटनेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

'इसिस काश्मीर'कडून गंभीरला जीवे मारण्याची धमकी

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला 'इसिस काश्मीर' या संघटनेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबतची तक्रार गौतम गंभीरने दिल्ली पोलिसात केली आहे. सध्या दिल्ली पोलिस याची चौकशी करत आहेत.

गंभीरला जीवे मारण्याची धमकी आल्याबद्दल मध्य दिल्लीच्या डीसीपी श्वेता चौहान यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, खासदार गौतम गंभीर यांना इसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार केली आहे. यानंतर गंभीर यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गौतम गंभीरने दिल्ली पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, त्याला आयएसआयएस काश्मीरकडून धमकी आली आहे. ई-मेलवरून ही धमकी पाठवण्यात आली असल्याचंही गंभीरने सांगितलं आहे. दहशतवादी संघटनेनं गंभीरला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अधिकृत ई मेल आयडीवर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास धमकीचा मेल आला असल्याचं गंभीरने या पत्रामध्ये म्हटलं आहे.

loading image
go to top