कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचे आज पहाटे 2.45 वाजता बेंगळुरू येथील राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव आज मद्दूर येथे नेण्यात येणार आहे. दीर्घकाळ काॅंग्रेसमध्ये राहिलेले एमएम कृष्णा नंतर भारतीय जनता पक्षात दाखल झाले.
मिळालेलेल्या माहितीनुसार ते काही दिवसांपासून आजारी होते आणि ऑक्टोबरमध्येही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी गेल्या वर्षीच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.