
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील बागपत येथे जन्मलेले माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज (मंगळवार) 5 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात निधन झाले. ते काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे खासगी सचिव के. एस. राणा यांनी दिली आहे. सत्यपाल मलिक यांनी 79 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या संपत्तीबद्दल चर्चा सुरू झाली आहे.