Fromer Haryana CM Om Prakash Chautala : हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना सकाळी 11.30 वाजता हाॅस्पिटलमध्ये आणण्यात आले. दुपारी 12 वाजता त्यांचे निधन झाले. चौटाला यांच्या निधनामुळे हरियाणा आणि देशाच्या राजकारणात शोककळा पसरली आहे. ओमप्रकाश चौटाला हे सात वेळा आमदार आणि पाच वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.