'जर प्रसिद्धी मिळाली, तर सोनू सूद बना कंगना नाही' | Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Sood
'जर प्रसिद्धी मिळाली, तर सोनू सूद बना कंगना नाही'

'जर प्रसिद्धी मिळाली, तर सोनू सूद बना कंगना नाही'

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. कंगना टाईम्स नाऊच्या कार्यक्रमात म्हणाली, की १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरे स्वातंत्र्य देशाला २०१४ मध्ये मिळाले आहे. यावरुन सध्या सोशल मीडियावर कंगनावर टीका होत आहे. माजी आयएएस अधिकारी सूर्याप्रताप सिंह (Former IAS Surya यांनी ट्विटरद्वारे कंगना राणावतवर टीका केली आहे. यामुळेच म्हणतो की जर प्रसिद्धी मिळाली तर सोनू सूद बना, कंगना नाही. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरुसह लाखो स्वातंत्र सैनिकांच्या बलिदानाला भीक म्हणणारी कंगना, अशा शब्दांमध्ये सूर्याप्रताप सिंह यांनी संताप व्यक्त केला आहे. (Kangana Ranaut)

हेही वाचा: गटविकास अधिकाऱ्याला उपसभापतीने बंद खोलीमध्ये डांबून केली मारहाण

सिंह यांना प्रतिसाद देत शैलेंद्र कुमार म्हणाले, भारताच्या लोकांना मुर्ख बनवणारे पंतप्रधान बरोबर म्हणतात, की जागतिक इतिहास लोकांना सांगेल की नरेंद्र मोदी आणि मीडियाने भारतीयांना मुर्ख बनवले.

आता तिला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. भाजपचे सरकार बनले तर तिला शिक्षण मंत्री बनवले जाऊ शकते, असा उपरोधक टोला विना नेगी यांनी लगावलाय

loading image
go to top