Breaking: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना 'पद्मविभूषण' जाहीर!

टीम ई-सकाळ
Monday, 25 January 2021

यंदा पद्मविभूषणसाठी सात जणांची निवड करण्यात आली आहे. 

Republic Day 2021: नवी दिल्ली : दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. यंदाही या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देण्यात येणाऱ्या आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा सोमवारी (ता.२५) करण्यात आली. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना 'पद्मविभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदा पद्मविभूषणसाठी सात जणांची निवड करण्यात आली आहे. 

आणखी वाचा - पद्म पुरस्कारांची घोषणा वाचा यादी एका क्लिकवर​

१९५४ पासून हे पुरस्कार दरवर्षी देण्यास सुरवात झाली. सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकारांत विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Japan PM Shinzo Abe among 7 Padma Vibhushan awardees