पद्म पुरस्कारांची घोषणा, वाचा यादी एका क्लिकवर

टीम ई-सकाळ
Monday, 25 January 2021

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीमध्ये दिवंगत गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचाही समावेश आहे.

Padma Awards 2021:प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वी संध्येला आज, पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. या महाराष्ट्रातून सामाजिक कार्यातील सिंधूताई सपकाळ आणि गिरीष प्रभूणे या दोघांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पूरस्कार घोषित करण्यात आलाय. यासह जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीमध्ये दिवंगत गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचाही समावेश आहे. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

आणखी वाचा - पुण्यातील शहर पोलिस दलाचा सन्मान तिघांना पुरस्कार

पद्मश्री

 • सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)
 • गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)
 • नामदेव कांबळे (साहित्य)
 • परशूराम गंगावणे (साहित्य)
 • जसवंती बेन जमनादास पोपट (उद्योग)
 • रजनीकांत श्रॉफ

पद्मभूषण

 • सुमित्रा महाजन (माजी लोकसभा सभापती)
 • रामविलास पासवान (दिवंगत नेते, लोक जनशक्ती पक्ष)
 • तरुण गोगोई (दिवंगत नेते, आसामचे माजी मुख्यमंत्री)
 • कल्बे सादिक (दिवंगत मुस्लिम नेते)

आणखी वाचा - पुण्यातील अग्निशमन अधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक

पद्मविभूषण

 • शिंजो आबे (जपानचे माजी पंतप्रधान)
 • एस. पी. बालसुब्रमण्यम (दिवंगत, गायक-संगीतकार)
 • सुदर्शन साहो (सँड आर्टिस्ट)
 • बी. बी. लाल (पुरातत्वशास्त्रज्ञ)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: padma awards 2021 list sindhutai sapkal shinzo abe girish prabhune