राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार थॉमस चंडी यांचे निधन; पवारांकडून श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

केरळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार थॉमस चंडी यांचे आज वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. थॉमस चंडी यांना कॅन्सर या रोगाने पछाडले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचारही चालू होते.

कोची : केरळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार थॉमस चंडी यांचे आज वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. थॉमस चंडी यांना कॅन्सर या रोगाने पछाडले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचारही चालू होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

थॉमस चंडी हे पिनरई विजयन यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले असून ते कुट्टानाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतीनिधीत्व करायचे. केरळातील कोची शहरात त्यांचे निधन झाले. चंडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले होते. कोचीमधल्या कडवंथरा या त्यांच्या राहत्या घरी त्यांचे साधारणतः ३:३०च्या सुमारास निधन झाले.डाव्या सरकारमध्ये त्यांनी परिवहन खात्याचा कारभार सांभाळला होता. थॉमस चंडी हे एक मोठे उद्योगपती होते. त्यांचा जन्म १९४७ मध्ये झाला होता. केरळा विधानसभेत ते सगळ्यात श्रीमंत असणारे आमदार होते. 

धक्कादायक ! फडणवीस सरकारच्या एका वर्षात ६० हजार कोटींचा घोळ; कॅगचा ठपका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थॉमस चंडी यांना श्रद्धांजली वाहिली असून चंडी कुटुंबियांच्या दुःखात मी सामील असल्याचे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Kerala Minister and MLA Thomas Chandy passes away at 72