esakal | IPS सुबोध कुमार जयस्वाल CBI च्या प्रमुखपदी
sakal

बोलून बातमी शोधा

IPS सुबोध कुमार जयस्वाल CBI च्या प्रमुखपदी

IPS सुबोध कुमार जयस्वाल CBI च्या प्रमुखपदी

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : IPS सुबोध कुमार जयस्वाल यांना सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्त केलं गेलं आहे. जयस्वाल हे 1985 बॅचचे भारतीय पोलिस सेवेचे (IPS) अधिकारी आहेत आणि ते याआधी 'महाराष्ट्र पोलिस विभागाच्या' महासंचालक पदावर राहिले होते. सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Force - CISF) चे महासंचालक आहेत. (Former Maha DGP Subodh Kumar Jaiswal appointed CBI Director)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमणा आणि कॉंग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने आणि आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे (सीबीआय) संचालक म्हणून नियुक्त केले. महाराष्ट्र केडरमधील 1985 च्या तुकडीचे अधिकारी सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा: भारत बायोटेकला विश्वास; जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळेल जागतिक मान्यता

सुबोध कुमार 1985 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी आणि महाराष्ट्राचे माजी महासंचालक आहेत. रिशी कुमार शुक्ला यांचा कार्यकाळ संपल्यानंतर फेब्रुवारीपासून सीबीआय प्रमुखांची जागा रिक्त होती. प्रविण सिन्हा हंगामी म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यानंतर एसीसीने Appointments Committee of Cabinet (ACC) जयस्वाल यांची नियुक्ती सीबीआय प्रमुख म्हणून केली आहे.

जयस्वाल यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पॅनेलच्या 90 मिनिटांच्या बैठकीनंतर घेण्यात आला. कॉंग्रेसच्या नेत्याने या निवडीसाठी घेतलेल्या प्रक्रियेला विरोध दर्शविला होता. जयस्वाल यांची ही नियुक्ती पदभार स्विकारल्यापासून दोन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी असेल.