Loksabha Speaker Manohar Joshi : विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा विश्वास मिळविणारा अध्यक्ष

आक्रमक विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय साधून लोकसभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात चालविणारे लोकसभा अध्यक्ष म्हणून मनोहर जोशी यांची ओळख संसदीय इतिहासात राहणार आहे.
Loksabha Speaker Manohar Joshi
Loksabha Speaker Manohar Joshisakal

नवी दिल्ली : आक्रमक विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय साधून लोकसभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात चालविणारे लोकसभा अध्यक्ष म्हणून मनोहर जोशी यांची ओळख संसदीय इतिहासात राहणार आहे. १९९९ मध्ये पहिल्यांदाच लोकसभेत निवडून गेलेल्या मनोहर जोशी यांची केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात काम केले.

परंतु २००२ मध्ये तत्कालीन लोकसभा अध्यक्ष व टीडीपीचे नेते जी.एम.सी बालयोगी यांचे अपघाती निधन झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षपदी मनोहर जोशी यांची एकमताने निवड झाली. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वतः त्यांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहात ठेवला आणि केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांनी या प्रस्तावाला समर्थन दिले. या प्रस्तावाला तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांनी समर्थन दिले.

Loksabha Speaker Manohar Joshi
Manohar Joshi : बॉम्बेचे मुंबई करणारा मुख्यमंत्री

संसदेच्या उच्च परंपराचे पालन करण्याची जबाबदारी मनोहर जोशी यांच्यावर असून त्यांना आतापर्यंत राजकीय कारकिर्दीमधून मिळालेल्या समृद्ध अनुभवाचा फायदा निश्चितपणे सभागृहाचे कामकाज चालविताना होईल, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी कौतुक केले होते. पंतप्रधान वाजपेयी यांनीही त्यांच्या कार्याचा उल्लेख केला होता.

विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी लोकसभा अध्यक्ष म्हणून मनोहर जोशी नियमितपणे सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर सर्व गटनेत्यांची बैठक बोलवित असत. त्यामुळे दिवसभरात दोन्ही बाजूंकडून झालेल्या संतप्त प्रतिक्रियांचे रुपांतर मवाळपणात होत असे. नेत्यांमधील तणाव दूर होण्यास मदत होत होती. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा सचिवालयाचे संगणकीकरण मोठ्या प्रमाणावर होण्यास सुरूवात झाली होती.

लोकसभेचे थेट प्रक्षेपण तात्काळपणे इंटरनेटद्वारे सदस्यांना व माध्यमांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी लोकसभा सचिवालयाला दिले होते. संसदीय कार्यासाठी असलेल्या समित्यांचे वारंवार बैठका होणे तसेच मतदारसंघातील कामांबद्दल सभागृहात बाजू मांडण्यासाठी शून्य प्रहाराचा अधिकाधिक उपयोग करण्यासाठी मनोहर जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून दिलेले योगदान मोठे आहे. त्यांच्या या कामकाजाच्या हातोटीमुळे त्यांनी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आदराचे स्थान मिळविले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com