काँग्रेसला 'अच्छे दिन'; पक्ष सोडून गेलेले माजी आमदार स्वगृही परतले

Congress
Congressesakal
Summary

सध्या कर्नाटकात विधान परिषदेची रणधुमाळी सुरु झालीय.

बेळगाव (कर्नाटक) : सध्या कर्नाटकात विधान परिषदेची (Legislative Council Elections Karnataka) रणधुमाळी सुरु असून अनेकजण पक्षांतर करत आहेत, तर काहीजण स्वगृही परतत आहेत. माजी आमदार रमेश कुडची (Former MLA Ramesh Kudachi) यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. रायबाग येथे झालेल्या काँग्रेस मेळाव्यात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. कुडची काँग्रेसमधून निजदमध्ये गेले होते. आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय झाले आहेत. कुडचींना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं आगामी विधान परिषद व 2023 मधील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election Karnataka) त्यांच्याकडं महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Congress
'ठरलं होतं, तसंच झालं'; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचं अध्यक्षपद हुकलं, पण..

समितीकडून कुडची बेळगावचे (Belgaum) महापौर झाले; पण 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून बेळगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली, त्यावेळी पहिल्यांदाच समितीचा पराभव झाला. त्याची राज्यात चर्चा झाली. 2004 मधील निवडणूक त्यांनी पुन्हा जिंकली. बेळगावात काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले; पण 2004 ते 2008 काळात कॉंग्रेसमधीलच काहींनी त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी केली. 2008 मध्ये बेळगाव उत्तर नवा मतदारसंघ तयार झाला. त्या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी होती. पण, पक्षानं फिरोज सेठ यांना उमेदवारी दिली. त्यामुळं कुडची यांनी धजदकडून निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला.

Congress
'पराभव झाल्यानं शरद पवारांकडं शिफारस कमी पडली अन् शिवेंद्रसिंहराजेंचं..'

2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप (BJP) उमेदवार सुरेश अंगडी (Suresh Angadi) यांचा प्रचार केला. त्यामुळं ते काँग्रेसपासून दुरावले होते. आता रमेश कुडची यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. रायबाग (Raibag) येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar), माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com