'अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजेंच्या नावाची मीच शिफारस केली होती; पण..'

Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Summary

'मागील निवडणुकीवेळी अध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजेंच्या नावाची मीच पवार साहेबांकडे शिफारस केली होती; पण..'

सातारा : जिल्हा बँकेची (Satara District Bank Election) अध्यक्ष निवड संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली होती. त्यात आमदार शशिकांत शिंदेंचा (Shashikant Shinde) पराभव राष्ट्रवादीच्या (NCP) जिव्हारी लागल्याने या निवडीमध्ये जास्त ट्विस्ट आलं होतं. भाजप आमदार शिवेंद्रराजेंनी (Shivendrasinharaje Bhosle) शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अध्यक्ष बनवण्याची विनंती केली होती. मात्र, शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांना (Nitin Patil) बँकेचं अध्यक्ष बनवलं. त्यामुळं शिवेंद्रराजेंना पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळू शकली नाही. या अध्यक्षपदाच्या निवडीवर आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलीय.

Shashikant Shinde
शरद पवारांच्या आशीर्वादामुळं नितीन काका अध्यक्ष झाले; पण..

मागील निवडणुकीवेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजेंच्या नावाची मीच पवार साहेबांकडे शिफारस केली होती. त्यामुळं ते अध्यक्ष झाले होते. पण, यावेळेस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माझाच पराभव झाल्याने माझ्या सारख्याची शिफारस कमी पडल्याने शिवेंद्रसिंहराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा खोचक टोला आमदार शशिकांत शिंदेंनी लगावला. ते पुढे म्हणाले, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी आमदार शिवेंद्रराजेंचं नाव वगळून खासदार शरद पवार यांनी नितीन पाटील यांना संधी दिली. बँकेचे नूतन अध्यक्ष नितीन (काका) पाटील यांना आमदार शशिकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्हा बँकेत नेहमीच पक्ष विरहीत कामकाज चालत आले आहे. कै. लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांनी पक्षाशी बांधिलकी ठेवत शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण केली होती. त्यामुळे त्यांच्या मुलाला श्री. पवार साहेब यांनी अध्यक्ष बनविलं आहे. याचा आनंदच असून कार्यकर्त्यांतही समाधानाचं वातावरण आहे.

Shashikant Shinde
'ठरलं होतं, तसंच झालं'; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचं अध्यक्षपद हुकलं, पण..

माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या आणि याच शरद पवार साहेबांनी ओळखल्या. त्यामुळेच नितीन पाटील यांना अध्यक्ष बनविल्याची भावना आमदार शिंदे यांनी बोलून दाखवली. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, मी निवडून आलो असतो, तर शिवेंद्रसिंहराजेंची शिफारस शरद पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो. या आधी शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते. तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्याकडे मीच शिफारस केली होती. यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली. त्यामुळेच शिवेंद्रसिंहराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा टोला ही आमदार शिंदे यांनी लागावलाय.

Shashikant Shinde
शिवेंद्रसिंहराजेंनी मनाचा मोठेपणा दाखवला : रामराजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com