महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 'या' माजी खासदाराकडे दिल्ली निवडणुकीची जबाबदारी

Former MP of congress Rajeev Satav to take the responsibility of Delhi elections
Former MP of congress Rajeev Satav to take the responsibility of Delhi elections

पुणे : महाराष्ट्रातील हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांच्यावर सोनिया गांधींनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यावर दिल्लीची धुरा देण्यात आली आहे. त्यांच्याकडे दिल्ली विधानसभेच्या स्क्रिनिंग कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या अगोदर पक्षाने त्यांच्याकडे गुजरात राज्याची जबाबदारी दिली होती. गुजरातमध्ये त्यांच्या व बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली होती. याचेच बक्षीस म्हणून येत्या दिल्लीच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवार निवडण्याच्या कमिटीवर त्यांना घेण्यात आले आहे. या निवडीवरून त्यांनी दिल्ली हायकमांडचा विश्वास संपादन केल्याचे दिसून येत आहे.

यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू. तसेच त्यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "मोदी सरकारने सध्या घेतलेले निर्णय जनतेविरुद्ध आहेत. जनसामान्यांमध्ये नागरिक दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी यावरून नाराजी आहे. देशात यावरून अराजक निर्माण झाले आहे, तरीपण सरकार शांत आहे. यावरून सरकारला जनतेचे देणे-घेणे नाही असेच दिसते आहे. मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. या कायद्याच्या बाबत त्यांनी मित्रपक्षांना देखील विचारात घेतले नाही."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com