दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ईडीच्या कार्यालयात दाखल

दोन प्रकरणांमध्ये ईडीनं त्यांना नोटीस पाठवली होती.
Sanjay Pandey
Sanjay Pandey

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दोन दिवसांपूर्वी अंमजलबाजवणी संचालनालयानं अर्थात ईडीनं नोटीस पाठवली होती. या नोटीशीनुसार संजय पांडे ईडीच्या दिल्ली येथील कार्यालयात पोहोचले आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज संबंधी कथीत घोटाळा प्रकरणी त्यांना ईडीनं चौकशीला बोलावलं होतं. (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey has been reached to ED Delhi office)

संजय पांडे निवृत्त होऊन तीन दिवस झाले होते तेव्हा त्यांनी ईडीनं नोटीस पाठवली. तर दुसरीकडं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते विश्वासून असल्यानं आणि ठाकरेंचं सरकार कोसळल्यानं पांडे यांच्या नोटीशीमुळं चर्चांना उधाण आलं होतं. दोन वेगवेगळ्या प्रकरणात त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज सर्व्हरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोप मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केल्याप्रकरणाचा समावेश होता.

Sanjay Pandey
"शरद पवारांना नाही 'या' दोन नेत्यांना घाबरतो"; शहाजी पाटलांनी सांगितली 'मन की बात'

ईडीनं आपल्या नोटिशीत संजय पांडे यांना ५ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता दिल्ली येथील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, संजय पांडे आज ईडीसमोर हजर झाले आहेत. आता किती तास त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होते हे पहावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com