"शरद पवारांना नाही 'या' दोन नेत्यांना घाबरतो"; शहाजी पाटलांनी सांगितली 'मन की बात'

"काय झाडी, काय डोंगार, काय हाटील" या डायलॉगमुळं आमदार शहाजी पाटील सध्या चर्चेत आहेत.
Shahaji Patil News
Shahaji Patil News

नवी दिल्ली : "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओक्के" या डायलॉगमुळं चर्चेत आलेले आमदार शहाजी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपण शरद पवारांना घाबरत नाही पण 'या' दोन नेत्यांना घाबरतो, असं त्यांनी स्वतःचं सांगितलं आहे. ज्या दोन नेत्यांची शहाजी पाटलांना भीती वाटते ते नक्की कोण आहेत? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. (Not Sharad Pawar but I scares these two leaders says Shahaji Patil)

Shahaji Patil News
'असे तयार होतात चविष्ट संजय राऊत', किरण मानेंची फेसबूक पोस्ट चर्चेत

शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप यांच्या नव्या सरकारची काल विधानसभेत बहुमत चाचणी पार पडली. यानंतर सर्व आमदार हॉटेलवारीतून मुक्त झाले. यानंतर अनेकांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शहाजी पाटलांनी देखील पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी आपल्याला शरद पवारांची भीती वाटत नाही पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भीती वाटते असं म्हटलंय.

Shahaji Patil News
नुपूर शर्मांना फटकारणाऱ्या SC बेंचवर 15 निवृत्त न्यायाधिशांचा आक्षेप

विधानसभेत बहुमत चाचणीनंतर बोलताना अजित पवारांनी शहाजी पाटील यांच्या डायलॉगचा उल्लेख करत "ते शहाजी बापू तिथं काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओक्के करत बसले" असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या उल्लेखाचा दाखला देताना शहाजी पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, अजित पवार आणि शरद पवारांनी आपल्याला खूप प्रेम दिलं. त्यांच्यासोबत आपण ३५ वर्षे राजकारण केलं आहे. अजित दादा हे दादाच आहेत, त्यामुळं मी त्यांच्याबद्दल कायम चांगलंच बोलणार. मी कधी शरद पवारांना घाबरलो नाही पण दोन व्यक्तींची मला जरुर भीती वाटते. यातील एक म्हणजे अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे. या दोघांना तसं घाबरण्याचं कारण नाही पण त्यांचा नैसर्गिकच दरारा वाटतो, असं शहाजी पाटील म्हणाले.

Shahaji Patil News
जितके निर्लज्ज बनला, तितके पुढे जाल; चित्रपट निर्मात्याची भाजपवर टीका

राज्यात गेल्या पंधरा दिवसात मोठा राजकीय भूकंप पहायला मिळाला. सुरुवातीला शिवसेनेशी बंड करुन सुमारे ४० आमदार नॉट रिचेबल होत सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते. या ठिकाणी रॅडिसन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. यावेळी आपल्या कार्यकर्त्यांशी फोनवरुन बोलताना शहाजी पाटील यांनी गुवाहाटीचा अनुभव शेअर करताना "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओक्के" असं विधान केलं होतं. त्यांची ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानं त्यांचा हा डायलॉग जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आला होता. या डायलॉगवर एक गाणही तयार झालं, त्याला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com