आर्यनला क्लीनचीटनंतर समीर वानखेडे म्हणाले, मला माफ करा..

Sameer Wankhede
Sameer Wankhedeesakal
Summary

अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला एनसीबीनं ड्रग्ज पार्टी प्रकरणात क्लिनचिट दिलीय.

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीनं कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cordelia Cruises Drug Party Case) क्लिनचिट दिलीय. आज एनसीबीनं न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. सहा हजार पानांचं हे आरोपपत्र आहे. यात आर्यनसह सहा जणांना क्लिनचिट देण्यात आलीय.

कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुराव्यांअभावी सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही, तर अन्य १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एनसीबीला हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदतवाढ ही २९ मे रोजी संपणार होती आणि त्यापूर्वी एनसीबीनं आज आरोपपत्र दाखल केलं आहे. विशेष न्यायालयात एनसीबीनं आपलं अंतिम आरोपपत्र दाखल केलंय. दरम्यान, वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी देखील सांगितलं की, एनसीबीच्या पहिल्या टीमनं या प्रकरणात चूक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी कारवाई करणाऱ्या एजन्सीचे माजी प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचं काहीही म्हणणं नाहीय. वानखेडे यांनीच गेल्या वर्षी क्रूझवर गनिम कारवाई केली होती.

Sameer Wankhede
सहारा समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका; नऊ कंपन्यांविरोधात SFIO चौकशी राहणार सुरू

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, खान यांना क्लीन चिट दिल्यानंतर वानखेडे प्रश्न टाळताना दिसले. चॅनलच्या म्हणण्यानुसार वानखेडे म्हणाले, 'माफ करा, मला काही बोलायचं नाहीय. मी एनसीबीमध्ये नाहीय. जा आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोला. विशेष म्हणजे, हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रात चांगलाच वाद निर्माण झाला होता. शुक्रवारी, एनसीबीनं (NCB) क्रूझवरील ड्रग्स प्रकरणात (Cruise Drugs Case) 6,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आणि आर्यन खानला क्लीन चिट दिली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकताना अटक करण्यात आलेल्या 23 जणांमध्ये खानचा समावेश होता.

Sameer Wankhede
बायकोला तिकीट नाकारून सहकारी पक्षाला सोडली राज्यसभेची जागा

2 मार्च रोजी दिलेल्या एका विशेष अहवालात म्हटलंय की, आर्यन खान हा ड्रग्सचा कट किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा भाग असल्याचं सूचित करणारा कोणताही पुरावा एजन्सीला सापडला नाहीय. खान याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आणि खंडणीचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर हे प्रकरण वादात सापडलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com